Fri, Feb 22, 2019 15:40



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिगबाज चालक: काच फोडून कुटुंबियांचे वाचवले प्राण!(व्हिडिओ)

जिगबाज चालक: काच फोडून कुटुंबियांचे वाचवले प्राण!(व्हिडिओ)

Published On: Jul 16 2018 7:14PM | Last Updated: Jul 16 2018 7:20PM



पनवेल : विक्रम बाबर 

कारचा ब्रेक निकामी झाल्याने पनवेल येथील घोट नदीत कार कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने चालकाने दाखवलेल्या हिम्मतीने या कारमधील कुटुंबाने कारच्या काचा फोडून टपावर बसत आपले प्राण वाचवले. 

याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, वावंजे गावातील अशरफ खलिल शेख व त्याची पत्नी हमिरा,  मुलगी सुहाना व नमिरा शेख हे वावंजे येथून आपली चार चाकी गाडी घेवून घोट मार्गे तलोजाला जात होते. घोट व घोटकॅम्प (कोयनावेळे) या गावांना जोडणाऱ्या अरूंद पुलावर कारचा ब्रेक अचानक निकामी झाला. यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार नदीत कोसळली. कार वाहत जावून एका दगडाला अटकली. यावेळीच कार चालकाने हिम्मतीने गाडीच्या काचा फोडून परिवाराला वर काढत गाडीच्या टपावर येवून बसले. यासंबंधी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांना यांची माहिती होताच ते कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी ही कार बाहेर काढत या कुटुंबाच प्राण वाचवले. यामुळे माेठी दुर्घटना टळली