Wed, Mar 20, 2019 03:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अन्न व औषध प्रशासन विभागावर फसवणुकीचा आरोप

अन्न व औषध प्रशासन विभागावर फसवणुकीचा आरोप

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:49AMमुंबई : प्रतिनिधी

ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी यांच्या मॅकडायसा या सॉफ्टवेअर कंपनीने अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य विभागासाठी एक ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार केले होते. या ऑनलाईन सॉफ्टवेअर बाबतीत अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांनी फसवणुक करुन जसेच्या तसे कॉपी केले आहे.त्यामुळे 22 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना एक ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करून पाहिजे होते.ते देण्यासाठी 2015 पासुन ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी हे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांसोबत संर्पकात होते. सॉफ्टवेअरची चाचणी घेऊन गरजेनुसार वेळोवेळी सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात होते. नोव्हेंबर 2017 मध्ये पुर्णपणे सॉफ्टवेअर तयार झाले.त्यानंतर सॉफ्टवरचे सादरीकरण निलेश मसारे ठाणे अन्न आणि औषध महाराष्ट्र ,सहाय्यक आयुक्त परळीकर आणि जॉईंट कमिशनर मुख्यालय चंद्रशेखर साळुंके यांच्या उपस्थितीत मुंबईला बिकेसी ऑफिस येथे करण्यात आले होते.त्यानंतर त्या सॉफ्टवेअरची गरज नसल्याचे मॅकडायसा या संस्थेला अचानक कळविले गेले. नक्की काय प्रकार सुरु आहे हे ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी यांना काहीच समजत नव्हते त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. 

7 जुनला डेटा वापरलेल्या सॉफ्टवेअरचा मंत्री  गिरीश बापट यांच्या उपस्थितीत लाँचिंग केले गेले.या सॉफ्टवेअरची सर्व माहिती संस्थेच्या योगेश खराडे याच्या मदतीने फसवून युजरनेम व पासवर्ड घेऊन हस्तगत केल्याचे समजले. सदर प्रकारामुळे मॅकडायसा कंपनीला व ज्ञानेश्‍वर युवराज सूर्यवंशी यांची रक्कम रुपये 22 लाख रुपयाची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. या विरोधात लेखी तक्रार अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्या कार्यालयात दिलेली आहे.परंतु कोणताच न्याय मिळत नसल्याने पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती यावेळी सुर्यवंशी यांनी दिली.