होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : फोर्ट परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग

मुंबई : फोर्ट परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग

Published On: Jun 09 2018 8:17AM | Last Updated: Jun 09 2018 8:17AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील फोर्ट परिसरात तीन मजली इमारतीला आज, शनिवारी सकाळी भीषण आग लागली. पटेल चेंबर्समध्ये लागलेल्या या आगीनंतर धुराचे लोट परिसरात पसरले त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच १८ अग्‍निशमनच्या गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्‍न सुरू असतानाच इमारतीचा एक भाग कोसळल्याने अग्‍निशमनचे दोन जवान जखमी झाले आहेत.

आगीचे नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. अधिकार्‍यांनी सांगितले की, अगोदर आग तिसर्‍या टप्‍प्यात होती. त्यानंतर चौथ्या टप्‍प्यात गेली. आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. तसेच इमारतीमध्ये कोण अडकलेलं आहे का? याचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या काही काळापासून मुंबईत आगींच्या घटनांत वाढ झाली आहे. यापूर्वी सिंधीया हाऊस येथे आग लागली होती. यातून पाच जणांना वाचवण्यात यश आले होते.