Tue, Jul 23, 2019 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वन विभागाने उंभार्ली परिसरात ३७४ बांधकामे पाडली

वन विभागाने उंभार्ली परिसरात ३७४ बांधकामे पाडली

Published On: Dec 07 2018 8:25PM | Last Updated: Dec 07 2018 6:13PM
ठाणे : प्रतिनिधी 

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात आज वन विभागाने फार मोठी कारवाई करून विभागाच्या २८ ए या संरक्षित जागेवरील अतिक्रमण करून बांधलेली ३७४ बांधकामे पाडली अशी माहिती उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन दिवसांपासून शिळा फाटा जवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे, शेड्स आदी विरोधाला न जुमानता मोठ्या संख्येने जमीनदोस्त करण्यात आली होती.

आज उंभार्ली येथील परिसरात पोलिस फौजफाटा तसेच शंभरावर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी धडक कारवाई करून ही बांधकामे पाडली. त्यामध्ये चाळी, दुकाने, शेड्स यांचा समावेश आहे. मुरबाडचे सहायक वन संरक्षक हिरवे, भामरे, कल्पना वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी सुमारे ३ हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करून घेण्यात आली.