Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलला दे धक्का

लोकलला दे धक्का

Published On: Feb 21 2018 2:06AM | Last Updated: Feb 21 2018 1:54AMठाणे : प्रतिनिधी

ठाणे ते वाशीदरम्यान ऐरोली स्थानकाजवळ वाशीला जाणारी लोकल अचानक बंद पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यावेळी या बंद पडलेल्या लोकलला मागून येणार्‍या दुसर्‍या लोकलने धक्का देत पुढे वाशी स्थानकात नेण्यात आल्यामुळे प्रवाशांचे गर्दीच्या वेळी प्रचंड हाल झाले. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ ठाण्यावरून वाशीला निघालेली लोकल अचानक  बंद पडल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे 40 मिनिटे बंद पडली. कामावरून सुटण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने ठाणे ते वाशी दरम्यान स्थानकांवर प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. 

रेल्वे अधिकार्‍यांनी ठाण्यावरून वाशीला जाणारी दुसरी लोकल बोलवून या बंद लोकलला जॉईंट करून धक्का मारत बंद पडलेली लोकल वाशी स्थानकात नेण्यात आली. या प्रकारामुळे तब्बल चाळीस मिनिटे ट्रान्स हार्बर मार्ग बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बंद लोकलला मागून धक्का देणार्‍या लोकलला पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.