Sun, Jul 21, 2019 02:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राची झाडेच्या हत्येनंतर ठाणे पोलीस सक्रीय

प्राची झाडेच्या हत्येनंतर ठाणे पोलीस सक्रीय

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:29AMठाणे : प्रतिनिधी

ठाण्यात एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची हत्या झाल्यानंतर महिलांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यास ठाणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीस रस्त्यात गाठून तू माझी झाली नाहीस तर तुला इतर कुणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी देणार्‍या रोडछाप मजनुस पोलिसांनी त्वरित अटक केली. तर दुसर्‍या एका अन्य घटनेत 18 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करीत तिला गर्भवती राहण्यास कारणीभूत ठरलेल्या भामट्यास देखील कासारवडवली पोलिसांनी अटक करून गजाआड केले.

ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात मागील दहा महिन्यात दाखल झालेल्या महिलांच्या छेडछाडी संदर्भातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांची सध्य स्थितीचे आवलोकन करावे असे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

या कारवाई मोहिमे अंतर्गत कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी दोन गुन्हे दाखल करून दोघा गुन्ह्यातील आरोपीना त्वरित गजाआड केले. तर दुसर्‍या एका अन्य गुन्ह्यात घोडबंदर रोड येथे राहणार्‍या 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीस लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करणार्‍या प्रतीक धनाजी काळदाते (22) या आरोपीस देखील पोलिसांनी तात्काळ अटक केली. आरोपीने सदर पीडित युवतीस गेल्या एका वर्षांपूर्वी लग्नाचे प्रलोभन दाखवले होते व तेव्हा पासूनच तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता. याच दरम्यान, पीडित युवती गर्भवती राहिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने मंगळवारी रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केली.