Mon, Sep 24, 2018 23:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्याच्या बंदमधून ठाणे मराठा क्रांती मोर्चाची माघार

उद्याच्या बंदमधून ठाणे मराठा क्रांती मोर्चाची माघार

Published On: Aug 08 2018 3:16PM | Last Updated: Aug 08 2018 3:17PMठाणे : प्रतिनिधी

राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून ठाणे मराठा क्रांती मोर्चाने माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. ठाणे मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्यावतीने ठाण्यात पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.

ठाण्यात बंदच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या रॅली होणार नाही. मात्र जे २१ मराठा बांधव आरक्षणासाठी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत तोंडाला काळी पट्टी लावून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, अष्टविनायक चौक कोपरी, कळवा नाका, वर्तक नगर नाका, वागले इस्टेट प्रभाग समिती, वाघबिल सुरज वाटरपार्क या सहा ठिकाणी निषेध मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

समाजातील तणाव वाढू नयेयासाठी शांततेच्या मार्गाने श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. ठाण्यात कुठेही बंद होणार नाही असे मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे.