Thu, Jun 20, 2019 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुस्ती - ज्युदोत देविकाला सुवर्ण पदक

कुस्ती - ज्युदोत देविकाला सुवर्ण पदक

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 13 2018 12:57AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

नवी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 30 वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये ठाण्याच्या देविका राजपुत यांनी कुस्ती व ज्युदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कैतुकाचा वर्षाव होत आहे.  30 वी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा 2018 नवी मुंबई येथे नुकतीच पार पडली. 10 जानेवारी रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत 59 कीलो वजनी गटामध्ये ठाण्याच्या देविका राजपुत हिने कोंकण रेंजच्या सहाणे, नाशिकच्या ज्योती झुगे आणि पुण्याच्या हेमलता घोडके यांना नमवित प्रथम क्रमांक पटकाविला. तर, ज्युदो स्पर्धेत 63 किलो वजनी गटात कोंकण रेंजच्या लतादेवी, नाशिकच्या ज्योती झुगे, मुंबई रेंजच्या स्वाती धोत्रे यांच्या पराभव करीत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. 

तसेच देविका या सलग 5 वर्षापासून पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेवून ठाणे जिल्ह्याला ज्युदो व कुस्ती या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. विशेष म्हणजे दोन्ही क्रीडा प्रकारात विजयी झाल्याबद्दल त्यांची राष्ट्रीय पोलीस स्पर्धांकरीता निवड करण्यात आली आहे. तसेच 2015 मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या ऑल इंडिया पोलीस स्पर्धांमध्ये कुस्ती स्पर्धेत कांस्य आणि 2016 मध्ये हरियाणा येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकाविल्या बद्दल त्यांना दोन पदोन्नती मिळवून त्या हवालदार झाल्या आहेत.