Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जि.प साठी आज मतदान

ठाणे जि.प साठी आज मतदान

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:37AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पाच पंचायत समित्या, तसेच 10 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. 14 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 53 जागा आहेत. त्यातील खोणी निवडणूक विभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक होत असलेल्या 52 जागांसाठी 152 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांमध्ये एकूण 106 जागांसाठी मतदान होत असून त्यासाठी 297 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मुंबईत एका जागेसाठी मतदान

मुंबई पालिकेच्या प्रभाग क्र.21 च्या भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी 2 उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे.