Tue, Nov 19, 2019 10:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात पब्ज, हुक्‍का पार्लर्सना अभय?

ठाण्यात पब्ज, हुक्‍का पार्लर्सना अभय?

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 2:02AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी 

मुंबईच्या कमला मिलच्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील पब, बार, हुक्कापार्लर आणि कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत हॉटेल्स, बारवर  कारवाई करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सभागृहात प्रशासनाला दिले. मात्र, शुक्रवारी प्रशासनाने कारवाईची नौटंकी करीत ठाण्यातील अनधिकृत पब, बार आणि हुक्कापार्लर यांना अभय देत कारवाई गुंडाळली. 

मुंबईच्या कमला मिलच्या दुर्घटनेनंतर झोपलेले ठाणे प्रशासनाचे अधिकारी जागे झालेत त्यांनी ठाण्यातील पब, हुक्का पार्लर, बार आणि हॉटेल्सवर शुक्रवारी कारवाई केली, आणि पुन्हा नोटीसा बजावण्याची नौटंकी सुरु करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचे  सूर आहेत. 

शनिवारी पालिका प्रशासनाने हॉटेल, हुक्का पार्लर, ब्रम्हांड येथील हॉटेल तुलसी आणि हिरानंदानी मेडोज येथील इंडेक्स बारवर कारवाई केली. दरम्यान महापौरांनी कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, पबवर आणि शहरातील अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्याला केराची टोपली दाखवून आता ठाणे पालिका प्रशासन बार आणि पबचा सर्व्हे करून नोटीसा पाठविण्याची नौटंकी कशाला करीत आहे असा सवाल विरोधी पक्षनेते यांच्यासह सुज्ञ नागरिक करीत आहेत.