Sat, Sep 21, 2019 04:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला

ठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:23AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे-नवी मुंबई मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्या रस्त्याचे काम गेले तीन दिवस सुरु करण्यात आले होते. त्यामुळे नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 

ठाणे - नवी मुंबई मार्गावरील विटावा जवळ रेल्वे पुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम शुक्रवारपासून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे ठाण्याकडून नवी मुंबईकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत बंदी घालण्यात आली होती. 

या कालावधीत नवी मुंबईकडून बेलापूर रोडने व ऐरोली पटणी कंपनी मार्गे विटावा-कळवा- ठाण्याचे दिशेने येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनास पटणी कंपनीकडून बेलापूरकडे मिळणार्‍या ठिकाणी प्रवेश बंद केला करण्यात आला होता. 

तर पर्यायी मार्गाने वाहने वळवण्यात आली होती. ऐन लाँग विकेण्डमध्ये या रस्ता दुरुस्तीचे काम सूरु करण्यात आल्याने गेले तीन दिवस मोठया वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. 

मात्र रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने मंगळवार पहाटेपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे कळवा विटावा मार्गे नवी मुंबईत जाण्यासाठी आता वाहनधारकांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार नाही. तसेच वाहतूक कोंडीतून देखील वाहन धारकांची सुटका होणार आहे.