Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण पालिकेचे बजेट १ हजार ८०९ कोटींचे

कल्याण पालिकेचे बजेट १ हजार ८०९ कोटींचे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कल्याण : वार्ताहर

पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी महासभेसमोर सादर केला. प्रदूषण, युवकांसाठी युथ पार्क, सुतका गृहाला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी अनेक तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. पालिका महापौर राजेंद्र देवळेकर पालिका आयुक्त गोविंद बोडके उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या उपस्थितीत सोमवारी स्थायी समितीने सादर केलेले सन 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचे स्थायी समितीचे जमा १ हजार ८०९ कोटी अठ्ठेचाळीस लाख जमा व आठशे नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये खर्चाचे व अखेर शिल्लक रक्कम अर्थ संकल्पीय अंदाज पत्रक मंजुरीसाठी महासभेच्या समोर सादर केले.

या अंदाज पत्रकात तब्बल 650 कोटींच्या विकास कामाना कात्री लावण्यात आली आहे प्रभागातील लहान मोठी कामे करण्यात यावी या साठी दिल्या जाणाऱ्या नगरसेवक निधीत हि कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारकडील थकीत अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, हा निधी मिळाला तर आर्थिक कोंडी फुटू शकेल मात्र केवळ राज्य सरकारवर अवलंबून न राहता सी.एस.आर अर्थात खाजगी कंपन्याच्या सामाजिक दायित्व निधीतून काही मोठे महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. पुढील वर्षात 1 हजार 650 कोटी रुपयांची विकास कामे पालिका क्षेत्रात करणार असून या मध्ये स्मार्ट सिटी अमृत योजना, स्वच्छ भारत योजना आदी योजनाचा समावेश असणार आहे.

महापालिकेत सामाविष्ठ करण्यात आलेल्या सत्तावीस गावातील उत्पन्न नगण्य आजपर्यत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे तसेच या भागातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 180 कोटी रुपयांची अमृत योजना दोन वर्षात पूर्ण करणार, या योजनेद्वारे रस्ते दुरूस्ती यांसारखी कामे कामे प्राधान्याने केली जातील. सरकारच्या ग्रोथ सेन्टरच्या पार्श्वभूमीवर पालिकेने या गावावर विशेष टाऊन शिप प्रस्तावित केले आहे. या गावातील आरक्षित भूखंडाचे सर्वेक्षण करून या भूखंडावर विविध सुविधा उपलब्ध करून देता येतील याकडे लक्ष केंद्रित केले . मालमत्ता करात 35 कोटी रुपयांनी वाढ करीत मालमत्ताकराचे उद्दिष्ठे 375 कोटी इतके देण्यात आले आहे. पाणी चोरी व गळतीचे प्रमाण चिंताजनक या बाबीकडे गांभीर्यपूर्वक  लक्ष देत या सर्व जोडण्या अधिकृत करता आल्यातर पालिकेच्या उत्पनात वाढ होईल असा दावा करीत पाणी पट्टीच्या वसुलीच्या खाजगीकारणाच्या कामाला वेग देण्याची गरज आहे. पाणी पट्टीच्या वसुलीच्या  60 कोटीच्या उद्दीष्ठात 10 कोटी रुपयांनी वाढ केली आहे. स्थानिक संस्था कर भरपाई अनुदान (जीएसटी अनुदान)या माध्यमातून 263 कोटी १६  लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

विशेष अधिनियामाखालील वसुली उत्पनवाढीसाठी महापालिका क्षेत्रात सुरु असलेली बांधकामे ,क्लस्टर डेव्हलेप्मेंट अर्थात समूह विकास योजना पालिकाक्षेत्रात लागू होणार असल्याने सदरची योजना मार्गी लागल्यास उत्पनात वाढ होईल,तसेच महापालिकेने ज्या तीन टाऊन प्लेनिंग स्कीम प्रस्तावित केल्या आहेत त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे. यंदाच्या विशेष अधिनियामा खालील वसुली उत्पनाच्या वसुलीत 25 कोटीची वाढ करीत कराचे उद्दीस्ठे 150 कोटी 10 लाख इतके देण्यात आले आहे .मालमत्ता करात वाढ करताना रस्त्यावरील पार्किंग पोलिसी निश्चित करणे,भाजी मंडई,मच्छिं मार्केट सुस्थितीत बांधून भाड्याने देणे  क्षेत्रनिहाय जाहिरातीच्या जागा निश्चित करून भाड्याने देणे, जाहिराती होर्डिंगकरता निविदा निश्चित करणे आदी प्रशासानाने प्रस्तावित केलेल्या रकमेत 15 कोटी रुपयांची वाढ करीत एकूण 27 कोटी 50 लाख रुपये इतके अपेक्षित उत्पन्न धरण्यात आले आहे इतर सेवा ,शुक्ल परवाने व संकीर्ण जमा या बरोबर उद्याने ,नाट्यगृह,अग्निशमन सेवाशुल्क ,रस्ते,खोदाई,साफसफाई शुल्क ,भंगार विक्री निविदा फाँम ,गुंतवणुकी वरील व्याज आदी स्त्रोतातून चांगल्या प्रकारे उत्पना मिळेल त्यापोटी एकूण 61  कोटी 32 लाख रुपयांचे अपेक्षित धरण्यात आले आहे .

महापालिका बजेटमधील काही ठळक मुद्दे

•   कल्याण डोंबिवलीत युथ पार्क सुरू करण्यासाठी 50 लाखांची तरतूद

•   एअर पोल्युशन इंडेक्स डिजिटल डिस्प्ले, 60 लाखांची तरतूद

•   डोंबिवली एमआयडीसीतील गणपती तलाव सुशोभीकरण - 25 लाखांची तरतूद

•   डोंबिवलीत टाटा पॉवरलेनखाली वाहनतळ बांधण्याचा मानस

•   गेल्या पाच वर्षां पासून बंद असलेल्या सुतीकागृहाच्या पुनर्बांधणी साठी स्थायी समितीने अडीज कोटी रुपयांची  तरतूद केली आहे तर आणखीन अडीज कोटी रुपये          महापालिकेला अनुदान स्वरूपात प्राप्त झाले आहे.

•   क्लीन प मार्शल : शहरातील अस्वच्छतेला कारणी भूत ठरणार्यावर क्लीन अप मार्शल वचक ठेवणार

•   उंबर्डे येथे 3 किलोमीटरचा सायकल ट्रॅक, 75 लाख तरतूद

•   नेतीवली टेकडीवरील आद्यक्रांतीकारक वासुदेव फडके गुहेचे सुशोभीकरण - 50 लाख

•   कल्याण डोंबिवली खाडीकिनारी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटसाठी 1 कोटींची तरतूद खाडीकिनारी पक्षी निरीक्षणासाठी 2 मनोरे उभारणार 15 लाखांची तरतूद

•   दुर्गाडी किल्ला परिसरात उद्यान आणि विहिरीचे पुनरुज्जीवन व वॉल क्लायंबिग धाडसी खेळासाठी उपयोगात  आणण्याचा - 25 लाखांची तरतूद

•   पालिका संगणक विभाग दुरुस्ती आणि निगा यासाठी 80 लाखांची तरतूद

•   अग्निशमन दलाच्या नविन वाहन खरेदीसाठी 1 कोटी तरतूद

•   केडीएमटी महसुली खर्चासाठी 1 कोटी 30 लाखांची तरतूद

•   सर्व प्रभागांमध्ये ई टॉयलेट सुविधा उभारणार 9 कोटींची तरतूद

 •   डोंबिवली पश्चिम पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी झोनिंग करणे - 25 लाखांची तरतूद

 •   27 गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी 3 कोटींची तरतूद.

 •   दिव्यांगांसाठी शाळा बांधणे - 50 लाखांची तरतूद.

 •   स्टार्ट अप इंक्यूबेटर : पालिकेतील तरुण वर्गाला व्यवसाय कसा सुरू करावा या साठी मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी एका प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रशिक्षण  केंद्रासाठी            10 लाखाची तरतूद

•    स्थानिक पातळीवर तारांगण प्रकल्प उभारणेसाठी 10 लाखांची प्राथमिक तरतूद.

•    पत्रकार आपत्कालीन मदत निधी 50 लाखांची तरतूद

•    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी निधीची तरतूद
 

Tags : Kalyan Dombivali Municipal Carporation, Politics, Budget 2018-19, 


  •