Thu, Oct 17, 2019 03:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालगाडीचे डब्बे घसरले, मुंबईकडे येणाऱ्या लोकल विस्‍कळीत (व्हिडिओ)

मालगाडीचे डब्बे घसरले, मुंबईकडे येणाऱ्या लोकल विस्‍कळीत (व्हिडिओ)

Published On: Dec 06 2017 5:15PM | Last Updated: Dec 06 2017 5:45PM

बुकमार्क करा

ठाणे : अमोल कदम

मध्य रेल्वे जलद मार्गावरील मालगाडी कळवा पूर्व आनंद नगर रेल्वे क्रॉसिंग येथून नवी मुंबईकडे जात असताना घसरली. यामध्ये मालगाडीचे पाच डब्बे जलद मार्गावर घसरले, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल ठप्प झाल्या आहेत.

मालगाडीचे अर्धे डब्बे नवी मुंबईच्या दिशेने आले तर मागील पाच डब्बे जलद मार्गावर राहिले. त्यामध्ये मालगाडी क्रॉसिंग करताना मागील पाच डब्बे घसरल्याने जलद मार्गावरील लोकल वाहतूक 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकलच्या एकामागोमाग रांगा लागल्या असून, प्रवाशी लोकल मधून उतरून कळवा रेल्वे स्थानकाकडे जात आहेत. तर काही प्रवाशी खाजगी वाहनांनी पुढील स्थानकावर जात आहेत.