होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीची परीक्षा आजपासून

दहावीची परीक्षा आजपासून

Published On: Mar 01 2018 2:04AM | Last Updated: Mar 01 2018 2:01AM



मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्या (गुरुवार)पासून सुरू होत आहे. यंदा या परीक्षेला मुंबई विभागात 3 लाख 82 हजार 544विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तर राज्यभरातून 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी परिक्षा देणार आहे. बारावीप्रमाणे याही परीक्षेला 10.30नंतर एक मिनिटेही उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना 11 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. यंदा या परीक्षेला राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमधून 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी बसले असून, 4 हजार 657 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहेत. 

दहावीचा पहिला पेपर मराठीचा होणार असून 24 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. बारावी परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेलाही कडक नियम लागू झालेले आहेत.