Tue, Apr 23, 2019 14:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरपरीक्षेतही दहावीचा निकाल घसरला

फेरपरीक्षेतही दहावीचा निकाल घसरला

Published On: Aug 30 2018 2:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:53AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाच्या फेरपरीक्षेचा निकाल 23.66 टक्के लागला असून राज्यभरात 1 वाख 21 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी केवळ 28 हजार 645 विद्यार्थी पास झाले आहेत तर मुंबई विभागात 33 हजार 397 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 4 हजार 747 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी राज्याचा निकाल 24.44 टक्के इतका होता.  

मार्च मध्ये झालेल्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून दहावी आणि बारावी बोर्डाची जूलैमध्येच फेरपरीक्षा घेण्यात येते. 17 जुलै ते 2 आगस्ट या कालावधीत ही दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण 1 लाख 12 हजार 17 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 1 लाख 21 हजार 59 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 28 हजार 645 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घसरण झाली आहे. गेल्यावर्षी हा  निकाल 24.44 टक्के लागला होता. तर 2016 च्या परीक्षेत निकाल निकाल 27.97 टक्के इतका होता. यावर्षी सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा असून 32.83 टक्के इतका निनकाल आहे. औरंगाबाद येथून 12 हजार 959 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4 हजार 255 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागातून यंदाही सर्वाधिक 33 हजार 397 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 हजार 747 विद्यार्थी परीक्षेत पास झाले असून निकालाची टक्केवारी 14.21 टक्के इतकी जाहीर करण्यात आली आहे.