होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्‍हाडाचा टेम्पो उलटून तीन ठार

वर्‍हाडाचा टेम्पो उलटून तीन ठार

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:21AM

बुकमार्क करा

अस्वली स्टेशन : वार्ताहर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर शिवारात वालदेवी पुलाजवळ मंगळवारी (दि.19) सकाळी दहाच्या सुमारास वर्‍हाडाचा टेम्पो उलटला. या अपघातात पाच वर्षाचा बालक कार्तिक दीपक माळी व अन्य दोन जण (नाव समजू शकले नाही) ठार झाले, तर जवळपास पस्तीस वर्‍हाडी गंभीर जखमी झाले आहेत. 

अस्वली स्टेशन येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीवर बाळू बर्डे (रा. नानेगाव) यांच्या मुलीचा विवाह पाथर्डी येथील बाळू माळी यांचा मुलगा किरणशी होणार होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे नवरदेव आणि जवळपास पन्‍नास ते साठ इतर वर्‍हाडी टेम्पोने (एमएच-15, डीके 2090) अस्वली स्टेशनकडे येण्यास सकाळी 9 वाजता निघाले. दहाच्या सुमारास टेम्पो रायगडनगर शिवारात वालदेवी नदीच्या पुलावरून पुढे येताच वर्‍हाड जास्त असल्याने टेम्पो हेलकावे घेऊन महामार्गाच्या डिव्हायडरवर जाऊन धडकला आणि डाव्या बाजूला उलटून खोल चारीत अडकल्याने हा अपघात झाला.