Thu, Jun 27, 2019 12:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टेंपल रोज रियल इस्टेटचा ७०० कोटींचा घोटाळा

टेंपल रोज रियल इस्टेटचा ७०० कोटींचा घोटाळा

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:28AM

बुकमार्क करा


मुंबई : प्रतिनिधी

जमीन खरेदी करणार्‍या ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या पुण्यातील  टेंपल रोज रियल इस्टेट कंपनीचे संचालक देवीदास सजनानी, दिपा सजनानी आणि वनिता सजनानी या तिघा जणांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. ग्राहकांची फसवणूक होत असताना आरोपी महिला असल्यातरी अशा व्यक्तींना जामीन देणे योग्य होणार नाही, असे मत व्यक्त करून न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. यापूर्वीच अन्य प्रकरणात देवीदास सजनानी यांना पोलिसांनी दुसर्‍या प्रकरणात अटक केली आहे.

या कंपनीने ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, हैद्राबाद या भागात जमीन खरेदी करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या ग्राहकांनी पैशाची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्यानंतर या कंपनीकडून व्यवहार पूर्ण करून दिला जात असे. जर व्यवहार पूर्ण झाला नाही तर चार वर्षात रक्कम दुप्पट देण्याची योजना आखण्यात आली होती. याप्रकरणी अभय कांतीलाल  शहा यांनी पुणे पोलीस ठाण्यात तक्रार नोदविल्याने या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला त्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड.

रूतुजा आंबेकर यांनी जोरदार विरोध 

केला. हा घोटाळा सुमारे 700 कोटीचा आहे. सुमारे सात हजार ठेवीदारांची फसवणूक झाल्याने जामीन देऊ नये अशी विनंती करताना देवीदास सजनानी यांना यापूर्वीच दुसर्‍या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आरोपींच्या वतीने अ‍ॅड. हर्षद पोंडा यांनी  संचालक महिला असल्याने जामीन द्यावा, अशी विनंती केली. ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.