Sat, Aug 24, 2019 23:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे

शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 12:50AMजव्हार : वार्ताहर

जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचा संतापजनक प्रकार जुन्नर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित शिक्षक आणि संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संचालकाला रविवारी (काल) अटक करण्यात आली.

जव्हार प्रकल्पातील 250 आदिवासी विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतात. यातील 4 आदिवासी विद्यार्थिनींसोबत तेथील संस्थाचालक व दोन शिक्षकांनी हे घृणास्पद कृत्य केले. यामुळे विद्यार्थिनींच्या संरक्षाचा प्रश्‍न चव्हाट्यावर आला असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत आदिवासी अस्मिता संघटना पालघरने पुढाकार घेऊन विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी त्या संचालकासह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यापैकी संचालकाला रविवारी अटक करण्यात आली.

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुलांसाठी मोफत खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड करून आदिवासी विकास विभागाकडून निवड केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या नामवंत शाळांमध्ये ही मुले पाठवली जातात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण फी आदिवासी विकास प्रकल्पातून भरली जाते.

आदिवासी विकास प्रकल्पातील पाचगणी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत डहाणू प्रकल्पातील एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आदिवासी विकास प्रकल्पाने निवडलेल्या इंग्रजी शाळांत असे मृत्यू प्रकरणे आणि घृणास्पद प्रकार घडत असल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.