Sun, Mar 24, 2019 13:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 8:52AMमुंबई : प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर तसेच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 25 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपा-शिवसेना पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने  चुरस अधिकच वाढली आहे. 

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधीत्व करणार्‍या आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याऐवजी शिवसेनेने विलास पोतनीस उमेदवारी दिली आहे. तर भाजपने अ‍ॅड. अमित मेहता यांना उमेदवारी देत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे.  शेकापचे अ‍ॅड.राजेंद्र कोरडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्यांच्या पाठिंब्यावर नशीब अजमावत असून मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार यांच्यासह एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.  

कोकण पदवीधर मतदारसंघात अ‍ॅड. निरंजन डावखरे हे पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला, तर शिवसेकडून माजी महापौर संजय मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे आमदार कपिल पाटील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर भाजपाने अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना रिंगणात उतरविल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

नाशिक शिक्षक मतदासंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दराडे, काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंब्यावर संदीप बेडसे लढत देत आहेत.