Thu, Feb 21, 2019 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टॅक्सी, रिक्षाचा प्रवास महागणार?

टॅक्सी, रिक्षाचा प्रवास महागणार?

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 11 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला पुढील काही महिन्यांतच टॅक्सी आणि रिक्षांच्या प्रवासी भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या वाढणार्‍या किमती आता काही पैशांनी कमी होऊ लागल्या आहेत, मात्र त्याचवेळेस सीएनजीच्या किमतीही वाढल्या आहेत. सीएनजीच्या वाढत्या किमतीमुळे भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी केली आहे. 

सरकारने नेमलेल्या कठुआ कमिटीने टॅक्सी आणि रिक्षासाठी एक-एक रुपयांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी सरकारकडे पाठवला होता. मात्र सरकारने तो प्रस्ताव अजूनही मंजूर केला नाही. गेल्या सहा महिन्यांत सीएनजीच्या किमती दोनवेळा अनुक्रमे 80 पैसे व 1 रु. 95 पैसे या प्रमाणे वाढल्या. तेव्हापासून टॅक्सी व रिक्षाचालक 20 पैसे प्रतिकिलोमीटर नुकसान सहन करत असून, प्रवासी भाडेवाढीची मागणी होऊ लागली आहे. पेट्रोल-डिझेल सलग बाराव्या दिवशी स्वस्त झाले आहे. पेट्रोलचे दर 40 पैसे आणि डिझेलचे दर 32 पैशांनी कमी झाले आहे. गेल्या बारा दिवसांमध्ये सुमारे 2 रुपयांनी दर कमी झाले आहेत. मुंबईत सीएनजीचे दर प्रतिकिलोमागे 1 रुपये 95 पैसे एवढे वाढले. यामुळे मुंबईत सीएनजीसाठी प्रति किलो 46 रुपये 17 पैसे मोजावे लागत आहेत. मुंबईबाहेर सीएनजीचे दर अधिकच वाढल्यामुळे भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी केली आहे.