Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुरबाडमध्ये मॉर्निंग वॉक करताना दोघांना चिरडले

मुरबाडमध्ये मॉर्निंग वॉक करताना दोघांना चिरडले

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 1:18AM

बुकमार्क करा
मुरबाड : वार्ताहर

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे साई मंदिराजवळ रविवारी सकाळी 7 च्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणार्‍या दोघांना तवेरा गाडीने चिरडले. पांडुरंग सीतापराव (64, निवृत्त शिक्षक), रामचंद्र पादीर (62, माजी विस्तार अधिकारी-पंचायत समिती) अशी या दोघांची नावे आहेत. माळशेजकडून मुरबाडला जाणार्‍या या तवेरा गाडीचा  चालक फरार असून, मुरबाड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.