Fri, May 24, 2019 02:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तासगावकरप्रकरणी ‘तंत्रशिक्षण’ करणार चौकशी

तासगावकरप्रकरणी ‘तंत्रशिक्षण’ करणार चौकशी

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:15AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कर्जत येथील तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाने शिक्षकांच्या रखडलेल्या पगारप्रश्‍नी काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कॉलेज प्रशासनाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता राज्य तंत्र शिक्षण संचालनालाया (डीटीई)ने देखील यासंदर्भात सहसंचालकांना आदेश दिले आहेत.

कर्जत येथे सरस्वती शिक्षण संस्थेच्या तासगावकर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालयातील 15 महिन्यांपासून वेतन प्रलंबित असून याविरोधात येथील प्राध्यापक रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी मुक्ता या प्राध्यापक संघटनेने यासंदर्भात 24 ऑगस्ट 2018 रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेताना मुंबई विद्यापीठाने समिती गठीत केली होती. मुळात 15 महिने वेतन प्रलंबित असताना शुल्क नियामक प्राधिकरणाने या कॉलेजांची फी कशी ठरवली. विद्यापीठाने संलग्नता कशी दिली? या संस्थेंकडून कर्मचार्‍यांची रक्कम न भरल्याने, भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा प्रश्न जास्त चिघळला होता. 

अखेर या सर्व प्रकरणाची दखल घेताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कॉलेज प्रशासनाला चौकशीसाठी बोलविले होते. त्यानंतर आता राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने देखील कॉलेजची झाडाझडती घेण्याचे ठरविले आहे.