Mon, Jun 24, 2019 17:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तारापूर अणुऊर्जा प्रकल्प भरती वाद, वाहनांची तोडफोड

तारापूर : प्रकल्प भरती वादातून वाहनांची तोडफोड

Published On: Jun 04 2018 1:11PM | Last Updated: Jun 04 2018 1:11PMमनोर : वार्ताहर 

तारापूर अणू ऊर्जा प्रकल्पातील नोकर भरतीमध्ये जाणून बुजून स्थानिकांना डावलले जात आहे. असा आरोप करत स्थानिकांनी आज आंदोलन छेडले. यावेळी तारापूर पाचमार्ग परिसरातील नागरिकांनी उग्र आंदोलन करत एनपीसीआयएलच्या बसेस फोडल्या. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार अमित घोडा घटनास्थळी पोहोचले आहेत. घोडा यांना अणुऊर्जा प्रकल्पाच्या काही अधिकाऱ्यांनी बोलवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रकल्पग्रस्त स्थानिक गावकऱ्यांना ३ आणि ४ अणुऊर्जा प्रकल्पातून नौकरीसाठी कॉल येऊन सुद्धा जाणूनबुजून डावलले जात आहे. त्या ऐवजी परप्रांतीयांना नोकरी दिली जात आहे.
 

Tags : Tarapur Atomic Power Station, employment dispute,  local unemployed youth protest, stone pelting on NPCIL bus