Wed, Sep 18, 2019 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत इव्हीएममध्ये छेडछाड; दोन महसूल कर्मचारी निलंबित

भिवंडीत इव्हीएममध्ये छेडछाड; दोन महसूल कर्मचारी निलंबित

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 12:51AM

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शेलार गट व कोलिवली गणात 13 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतदानावेळी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी भिवंडी तहसील अंतर्गत असलेल्या खोणी तलाठी व कार्यालयीन लिपिक या दोघांवर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तर तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 

भिवंडी तालुक्यात 21 जि. प. गट व 42 पंचायत समिती गणांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 38-जि. प. शेलार गट व 76-कोलिवली गणात मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने पुरवलेल्या इव्हीएम मशीनमध्ये खोणी तलाठी चित्रा विशे व लिपिक चंद्रकांत शिरसाठ यांनी संगनमताने इव्हीएम मशीनवर सेनेचे उमेदवार गुरुनाथ म्हसकर यांचे नाव व धनुष्य बाणाची निशाणी गायब करून पं. स. गणात रिपाइं उमेदवार निलम साळुंखे या उमेदवार नसताना त्यांचे नांव व निशाणी लावून भाजप उमेदवार गंगाराम साबळे यांना फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मतदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या घटनेची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व राज्य निवडणूक आयोगाकडे करताच त्याची दखल घेवून शेलार जि. प. गट व 75-शेलार आणि 76 कोलिवली या गणांची मतमोजणी रोखून निवडणूक निर्णय जाहीर करण्यास स्थगिती दिली.

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex