Wed, Jan 16, 2019 14:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनधिकृत बांधकामांवर बेधडक कारवाई कराः उद्धव ठाकरे

अनधिकृत बांधकामांवर कारवाई कराः उद्धव ठाकरे

Published On: Jan 06 2018 3:15PM | Last Updated: Jan 06 2018 3:21PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील अनधिकृत व धोकादायक बांधकामाविरोधात महापालिकेने जी धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे त्याला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. अनधिकृत बांधकाम असेल तर बेधडक कारवाई करा, कोणत्याही राजकीय दबावाला जुमानू नका, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केली.

शिवसेना भवन येथे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कमला मिल दुर्घटना आणि मुंबईतील अनधिकृत बांधकामाबाबत भूमिका जाहीर केली. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने छेडलेल्या कारवाईविषयी मी स्वत: आयुक्तांना सांगितलं आहे, कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता काम करा.  कुठेही कारवाई करण्यापूर्वी प्रथम बांधकाम अधिकृत आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. आयुक्तांनी कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरता काम करावं. मग तो नेता कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो कारवाई करावी, शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.