Mon, Apr 22, 2019 15:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नियम धाब्यावर बसवून ‘ताज’चा कारभार

नियम धाब्यावर बसवून ‘ताज’चा कारभार

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:52AMमुंबई : प्रतिनिधी 

देशभरातील नव्हे तर जगभरातील पंचतारांकित असलेल्या हॉटेलमधील एक उत्कृष्ट नामांकित अशा कुलाब्यातील ताज हॉटेलने एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. हॉटेलमध्ये रेस्टॉरंटचा परवाना नाही, अप्रशिक्षित कर्मचारी आणि अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय पांडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) याविषयी माहिती मागवली असता लिखित स्वरुपात एफडीएने ही माहिती दिली आहे. 

ताज महल पॅलेसच्या मालकीची अनेक 5 स्टार हॉटेल्स आहेत.या हॉटेलमध्ये एफडीएकडून सर्व्हे करण्यात आला असता हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ परवाना लावण्यात आला नसल्याचे समोर आले. शिवाय येथील अनेक कर्मचारी हे प्रशिक्षित नसल्याचेही एफडीएने उत्तरात म्हटले आहे. स्वयंपाक घराची पाहणी करताना येथे कालबाह्य झालेली लसूण चटणीची पाकिटे आढळून आली. शिवाय आरोग्यास हानिकारक असलेला अजिनोमोटो नावाचा अन्नपदार्थदेखील आढळल्याचे म्हटले आहे. 

एफडीएचे लॉजिंग ऑफिसर सुधाकर शिगवान यांच्या उपस्थितीत टाकलेल्या छाप्यात हॉटेलने एफडीएच्या सुमारे 15 नियमांचे उल्लंघन झाले असल्याची नोंद केली आहे, असे अभय पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान एफडीएने या अनियमिततेविरोधात काय कारवाई केली, हे समजू शकले नाही. 

या नियमांचे झाले उल्‍लंघन

 स्टोअर हाउसच्या तपासणीदरम्यान, इतर खाद्यपदार्थांच्या वस्तूंबरोबर कालबाह्य ठरलेली लसुन चटणी 

 शरीरास हानिकारक ठरणारे अजिनोमोटोचे पाकिट (मोनो सोडियम ग्लुटामेट (एमएसजी) 

 महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून जारी करण्यात आलेली डिलक्स ग्रेड सर्टिफिकेट पाच स्टार हॉटेल्स / रेस्टॉरंट्ससाठी देण्यास अपयशी ठरले.

 व्यवस्थापनाने कोणत्याही सूचना/सूचना किंवा स्वयंपाक करण्यासाठी वापरलेल्या मुद्रित मेनू कार्डचा उल्लेख केला नाही.

 आस्थापनामध्ये फिफा आणि एफईओओ यंत्र वापर केला जात नाही

 आस्थापनेतील कर्मचार्‍यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास अयशस्वी ठरले.

आस्थापनामध्ये सात रेस्टॉरंट्स आहेत परंतु अन्नसुरक्षा कायदा 2006 नुसार आवश्यक असणारे व्यवस्थापन रेस्टॉरंट लायसन्स    दाखवण्यात अपयशी

एफडीएने दिलेला अहवाल वाचून मला धक्का बसला आहे. ताज महाल पॅलेससारख्या प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध हॉटेल एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का करत नाही. किंवा दुर्लक्ष का करतो ? यात कायद्याचे उल्लंघन होत असताना एफडीएने आस्थापनाविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असे अभय पांडे यांनी सांगितले.

 आमच्या लॉजिंग अधिकार्‍यांनी ताज हॉटेलमध्ये टाकलेल्या धाडीत काही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आस्थापनाला कळवले आहे. त्या ठिकाणी आढळलेल्या गोष्टी सध्या वापरात नसल्याचे तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. सर्व सूचनांचे पालन करण्याविषयी आस्थापनाला सक्त ताकिद देण्यात आली असल्याचे एफडीएचे सह आयुक्त शैलेष आढाव यांनी सांगितले.

Tags : Mumbai, Taj Hotel, violates, FDA rules, Mumbai news,