Fri, Apr 26, 2019 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : टीएमटी बसला आग, बस जळून खाक

ठाणे : टीएमटी बसला आग, बस जळून खाक

Published On: Jan 17 2018 10:16PM | Last Updated: Jan 17 2018 10:16PM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी 

ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या बसला मुंब्रा रेती बंदर जवळ राणा नगर येथे अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बसमधील चालक, वाहक आणि दोन प्रवाशी बचावले. 

मुंब्रा, पारसिक रेतीबंदर रोड नं 2, मुंब्रा रोड, येथे भारत गॅस बस स्टॉप येथून आनंद नगर, कासारवडवली बस स्टॉप येथे जात असणाऱ्या टी.एम.टी. बसला (क्रमांक MH 04 EP 797) आग लागली. तात्काळ घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दल, रेस्क्यू वाहन, ट्राफिक पोलिस आणि ठाणे पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रयत्‍न करून आग आटोक्‍यात आणली.