Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टीडीपीच्या भेटीस  उद्धव यांचा नकार

टीडीपीच्या भेटीस उद्धव यांचा नकार

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी 

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी तेलगू देसम पार्टीकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मोदी सरकार विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. त्यासाठी पाठींबा मिळविण्याच्या प्रयत्नात असणार्‍या टीडीपीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळास भेटण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. 

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र त्यासंदर्भात प्रत्यक्ष कारवाई करण्यास मोदी सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत टीडीपीने एनडीएनतून बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपुर्वी घेतला आहे. याच मुद्यावर पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार विरोधात टीडीपीकडून अविश्‍वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री नायडू यांनी यासंदर्भात एक पत्र लिहून भाजपा विरोधातील राजकीय पक्षांचा पाठींबा मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी टीडीपीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र ठाकरे यांनी टीडीपी खासदारांना भेटीसाठी वेळ दिलेली नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.