Sun, Feb 24, 2019 08:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील भरतीस स्थगिती

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील भरतीस स्थगिती

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:27AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पालघर येथील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात सुरू असलेली तृतीय श्रेणीतील नोकरभरतीला स्थगिती तसेच स्थानिक प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांना संधी देण्याचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही अणुऊर्जा प्रकल्प महाप्रबंधक सतीश कुमार शर्मा यांनी दिली.

प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी मुंबईतील अणुशक्तीनगर येथे शर्मा यांची भेट घेतली असता, या भेटीदरम्यान शर्मा यांनी हे आश्‍वासन दिले.खासदार गावित यांनी स्थानिकांच्या नोकरभरतीबाबत आग्रही मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत गावित यांनी  तृतीय श्रेणीतील कामगार भरतीत स्थानिक प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांना संधीसाठी आग्रही मागणी केली. शासनाच्या प्रकल्पबाधित नोकरभरती धोरणानुसार 80 टक्के जागा विस्थापित झालेल्या लोकांच्या भरल्या पाहिजे. नोकरभरतीमधील प्रश्‍नपत्रिकांमध्ये वैकल्पिक भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. तसेच सध्याची भरतीप्रक्रिया तत्काळ रद्द करून नव्याने भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणीही त्यांनी केली. संबंधित सर्व मागण्या केंद्र सरकारकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन शर्मा यांनी दिले.