Fri, Apr 26, 2019 16:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातून मासे झाले गायब... मासळी खाणार‘भाव’!

महाराष्ट्रातून मासे झाले गायब...

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 2:02AMमुंबई : चंदन शिरवाळे

मुंबईसह कोकणातील बांधवांचे प्रमुख अन्न असलेल्या विविध प्रकारच्या मासळीने गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्राचा किनारा सोडला आहे. खवय्यांच्या आवडत्या असलेल्या कुपा, रावस, बोंबिल, सुरमई, पापलेट, बांगड्यासह जवळा आणि करदीचाही तुटवडा निर्माण झाल्याने येत्या आठवडाभरानंतर मासळी चांगलाच ‘भाव’ खाण्याची शक्यता आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक, गोवा, गुजरात व केरळमधील मच्छीमार राज्याच्या किनारपट्टीवर अवैधरीत्या येऊन मासेमारी करतात. तरीही महाराष्ट्रात यापूर्वी मासेटंचाई निर्माण झाली नव्हती. त्यामुळे आताच मासे गेले कुठे, या प्रश्‍नाने मच्छीमारांचे डोके चक्रावले आहे. मुंबईसह कोकणच्या किनारपट्टीवरुन मासे पळून गेल्याने सुमारे 22 लाख मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

एक बोट समुद्रात जाऊन मच्छिमारी करून परत येण्यासाठी डिझेल आणि जनरेटरवर सुमारे दीड लाख रुपये खर्च येतो. पण मासळी जाळ्यात गावत नसल्यामुळे अनेक मच्छिमार हात हालवत परत येत असल्याचे पाहुन इतर मालक बोटी समुद्रात नेण्याचे धाडस करत नाहीत. सुमारे 11 हजार यांत्रिकी बोटींपैकी निम्म्या बोटींनी पावसाळ्यापूर्वीच नांगर टाकला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे अध्यक्ष रामदास संदे यांनी दिली. पर्सनीन जाळ्यांद्वारे करण्यात येणारी मासेमारी हे मासळीटंचाईचे एक कारण समजले जात होते. या जाळ्यांमध्ये मोठ्या माशांसोबत लहान मासेही अडकून मरतात. त्यामुळे मोठे मासे मिळण्यास अडचणी येत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून लाईटव्दारे (एलईडी) मासेमारीचा सपाटा सुरु आहे. रात्री समुद्रात गेलेले मच्छिमार विजेचा प्रकाश पाण्यात सोडत असल्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेले मासे वर येताच पर्ससीन जाळे फेकले जाते. या प्रकारामुळे माशांची कमतरता निर्माण झाली आहे. यासोबतच समुद्रात सांडपाण्याद्वारे जाणारे प्लॅस्टिक, जागतिक वातावरणात झालेला बदल, समुद्रात येणारी चक्रीवादळामुळे माशांनी राज्याचा किनारा सोडला असल्याचे संदे म्हणाले.

Tags : Mumbai, Surmai, paplet, bangda, Fish Scarcity, Mumbai news,