Sat, Jul 20, 2019 11:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

छगन भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील (एमईटी) कथित  गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वाच्च न्यायालयात धाव घेणार्‍या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. याचिकाकर्ते सुनील कर्वे व स्वातंत्रसैनिक बाळासाहेब जांभुळकर यांनी दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना दोघा याचिकाकर्त्यांना प्रत्येकी 50 हजाराचा दंड ठोठावला, अशी माहिती अ‍ॅड.साजल यादव यांनी दिली.

एमईटी मधील गैरव्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी विनंती करणारी याचिका ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष व संस्थापक विश्‍वस्त सुनील कर्वे यांनी उच्च न्यायालयात मार्च 2012 मध्ये केली होती.

उच्च न्यायालयाने   याचिकाकर्त्यांच्या हेतूबद्दल संशय व्यक्ती  करून याचिका  निकाली काढली होती. मात्र एमईटी ट्रस्टच्या बँकखात्यासंबधी चौकशी करणार्‍याचे आदेश दिले होते. त्या विरोधात   सुनील कर्वे व बाळासाहेब जांभुळकर  यांनी अपील दाखल केले होते. अपीलावर न्यायमूर्ती नरिमन आणि नवीन सिन्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी जांभूळकर यांनी स्वातंत्रसैनिक असल्याचा दावा केला. खंडपीठाने जांभुळकर यांच्या या मुद्दयाला जोरदार आक्षेप घेेतला.

स्वातंत्र मिळाले त्यावेळी जांभुळकर हे 16 वर्षाचे  असल्याने ते स्वातंत्र्यसैनिक असल्याचे खोटे श्रेय घेत असल्याचे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच जांभुळकर यांचे पुण्याला वास्तव्य असताना त्यांचा  नाशिक आणि पुणे प्रकरणात याचिकाकरण्याचा काहीच हेतू नाही. केवळ सुनील कर्वेंच्या सांगण्यावरून भुजबळांच्याच  ट्रस्टला त्रास देण्याचा याचिकाकर्त्याचा हेतू असून  त्यांनी खोडसाळपणे ही याचिका दाखल केल्याचे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली.