भक्ती कोणतीही असूदे, आपल्याला 'भारतभक्ती' सशक्त करायची आहे : पीएम मोदी

Last Updated: Nov 09 2019 2:01PM
Responsive image
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशाच्या राजकारणावर दुरगामी परिणाम करणाऱ्या अत्यंत संवेदनशील अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्ला विराजमानची असण्यावर  सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने शिक्कामोर्तब केले. 

या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्यांनी तीन ट्विट करत भावना व्यक्त केल्या. पीएम मोदी म्हणाले, देशातील सर्वोच्च न्यायालयाने अयोध्य प्रकरणावर  निर्णय दिला आहे. या निर्णयाकडे  जय किंवा  पराजय या नजरेतून पाहता कामा नये. रामभक्ति असूदे किंवा रहीमभक्ति ही वेळ आहे आपल्या सर्वांसाठी भारतभक्तिच्या भावनेला अधिक सशक्त करण्याची आहे. माझी देशवासियांना शांततेची, सद्भावना आणि एकता कायम राखण्याची विनंती आहे. 

न्यायालयाचा हा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतील जनसामान्यांचा विश्वास अधिक मजबूत करणार आहे.  आपल्या देशातील  बंधूभाव राखण्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेला १३० कोटी भारतीयांना ओळख द्यायची आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे वाद मिटवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया किती महत्त्वाची आहे, हे या निकालाने अधोरेखीत केले आहे. सर्वच पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ आणि संधी देण्यात आली. सौहार्दपूर्ण वातारणात न्याय प्रक्रिेयेने या प्रकरणाचे समाधान केले आहे.