Tue, Jul 16, 2019 12:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी

सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी

Published On: Apr 27 2018 1:39AM | Last Updated: Apr 27 2018 1:26AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा यशस्वीपणे कारभार करणारे आमदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी आपल्या पदाची सुत्रे खाली ठेवली. राज्यात पक्ष सत्तेवर नसतानाही पक्षविस्तारासाठी  त्यांचे कार्य पाहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्तीही केली.

पत्रकारांना याबाबतची माहिती देताना तटकरे यांना आपल्या भावना दडविता आल्या नाहीत. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वानुमते शरद पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे. पुणे येथे 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. आपण चार वर्षे या पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

आता आपल्याऐवजी दुसर्‍या कुणाकडे जबाबदारी सोपवावी, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली असल्याचे सांगत त्यांनी पुढील प्रदेशाध्यक्ष आपण नसेल, असे संकेत दिले. विधान परिषदेच्या जागांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या नेत्यांसोबत अजित पवार व आपण चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रीय पातळीवर चर्चा होवून निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही तटकरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.

Tags : Mumbai, Mumbai news, Sunil Tatkare,  NCP, National Secretary,