Mon, Jun 17, 2019 14:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाचे लॉचिंग

प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाचे लॉचिंग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील आझाद मैदानाच्या एल्‍गार परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात यांच्या पहिल्या सार्वजनिक भाषणाने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रीय झाल्याचे मानले जात आहे.

सोमवारी झालेल्या एल्‍गार परिषदेमध्ये सुजात आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी सरकारला पुरावे देऊनही संभाजी भिडे यांना अटक करण्यात न आल्याने सरकारचा त्यांनी निषेध व्‍यक्‍त केला, म्‍हणून हे सरकार आपल्याला बदलल्याशिवाय पर्याय नाही, असे मत त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केले.आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी केलेल्या पहिल्या सार्वजनिक भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. 

सुजात आंबेडकर यांनी २०१८ मधील दोन घटनांवर प्रकाशझोत टाकत हे सरकार कसे दलित विरोधी असल्याचे सांगितले. भीमा कोरेगाव आणि टीस स्‍कॉलरशीपच्या वादावरूनच या सरकारची भूमिका स्‍पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये ज्याप्रमाणे मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे त्याप्रमाणेच संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. एकबोटेप्रमाणेच भिडेही याप्रकरणातील महत्‍वाचे सूत्रधार आहेत त्यांना तातडीने अटक का करण्यात येत नाही असा सवाल त्यांनी उपस्‍थित केला. 

देशातील सामाजिक परिस्‍थिती गंभीर असून, आपण सक्षम होऊ नये यासाठीच हे सरकार षडयंत्र रचत असून सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. आंबेडकर यांच्या घराण्यातील ही चौथी पिढी राजकारण आणि समाजकारणात सक्रिय झाल्याने आझाद मैदानात जमलेल्या जनसमुदायाने त्‍यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.

Tag : Sujat Prakash Ambedkar, meeting, azad maidan mumbai, 


  •