Sun, Feb 17, 2019 09:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलेची बाळासह रेल्वेखाली आत्महत्या 

महिलेची बाळासह रेल्वेखाली आत्महत्या 

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:08AMठाणे : प्रतिनिधी 

भाईंदर रेल्वे स्थानकामध्ये एका महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीसह लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री 12 च्या सुमारास घडली. रिंकू यादव (27) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती पिंटू यादवला नवघर पोलिसांनी अटक केली.   

मूळची उत्तर प्रदेश येथील असणारी रिंकू  यादव ही नवघर येथे पती पिंटूसोबत राहत होती. या दोघांना एक साडेतीन वर्षांची मुलगी होती. लग्‍न झाल्यापासून पिंटू तिचा छळ करत होता. सततच्या छळाला कंटाळून शनिवारी रात्री 12 च्या सुमारास रिंकूने भाईंदर स्थानक गाठले. येथे फलाट क्रमांक 4 येथे थांबून ती जलद लोकलची वाट पाहत होती. 12 वाजून 8 मिनिटांची डाऊन मार्गावरून जाणारी जलद लोकल येताच तिने लोकल समोर उडी घेऊन आत्महत्या केली.  या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पिंटूविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती पश्‍चिम रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिली.