Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथाडी तरुणाची मराठा आरक्षणासाठी गळफासाने आत्महत्या

माथाडी तरुणाची मराठा आरक्षणासाठी गळफासाने आत्महत्या

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:10AMकोपरखैरणे/ बेलापूर :वार्ताहर 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात  ठिकठिकाणी सुरू असलेल्या आत्महत्येचे लोण आता नवी मुंबईत पोहचले आहे. दाणा बाजारात माथाडी कामगार असलेल्या अरूण भडाले या 26 वर्षीय तरूणाने सरकार आरक्षण देत नसल्याने आपल्या राहत्या घरी शनिवारी पहाटे 5 व्या सुमारास आत्महत्या करीत असल्याने सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.

राज्य शासन आरक्षण देणार नाही अशी चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केली. अरुणने श्रीराम सिटी फायनान्स या कंपनीत 2 लाख रुपये कर्जासाठी तगादा लावला होता. त्याने ऑनलाईन कागदपत्रे सादर केली. असता त्याला 2 लाख रुपये कर्ज मंजूर झाले.मात्र ते मिळण्यासाठी त्याला अनेक प्रकारचे चार्ज भरायचे होते.अरुणने कंपनीच्या सतीश नामक व्यक्तीकडे 2600 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.त्या नंतर पुन्हा अरुणकडे 11 हजार रुपये करारनामा करण्यासंबंधी मागण्यात आले.कर्ज देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक होत असल्याचे अरुणच्या लक्षात आले.श्रीराम सिटी फायनान्स या कंपनीचे मुंबईत कोणतेही कार्यालय नसून त्याचे मुख्य कार्यालय कोलकाता मध्ये आहे.कर्जासंबंधी सर्व व्यवहार हे ऑनलाईन केले जातात. मात्र त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांने आपल्याला फसविले असल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे. आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोन व्यक्तींच्या नावाचाही उल्लेख केला आहे. त्याच बरोबर सरकार आरक्षण देत नसल्याबद्दल आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करत आपले शवविच्छेदन करू नये, असे देखील सुचविले आहे.

कोपरखैरणे येथे मराठा आरक्षण आंदोलनात हा तरुण सहभागी झाला होता. देवेंद्र फडणवीस सरकार आरक्षण देणार नाही. हे सरकार गुजराथी मारवाडी समाजाच्या व्यवसायात हातभार लावत असल्याची टीका या तरुणाने चिठ्ठीत केली आहे. आहे. भोर तालुक्यात अरूण भडाले याचे मूळ गाव आहे.

माथाडी कामगारांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले असले तरी नोकर्‍या मिळत नाही. आमच्या माथाडी संघटनेकडून माथाडी बोर्डाची निर्मिती लवकरात लवकर करून त्यात माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरी द्यावी अशी मागणी या सरकारकडे गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहोत. मात्र यावर सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने सुशिक्षित माथाडी तरूणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाल्यानेच असे आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचललेल जात आहे. तरूणांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन मी करतो. सरकारने त्वरित माथाडी संघटनेचे विषय मार्गी लावावेत तसेच आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. 

- नरेंद्र पाटील, माथाडी नेते