Wed, Nov 21, 2018 01:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मित्राच्या विरहाने धारावीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या

मित्राच्या विरहाने धारावीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:13AMधारावी :

मित्राच्या विरहामुळे शोकाकूल असलेल्या गणेश सुरेश खंदारे (21) या तरुणाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना धारावी संत कक्कया मार्गावरील शिवशक्ती नगरमध्ये रविवारी सायंकाळी घडली. त्याच्या मित्रानेही नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. गणेश व अमित कटके जिवलग मित्र होते. नोव्हेंबरमध्ये  अमितने आत्महत्या केली होती. याचा  धक्का गणेशला बसला होता. तेव्हापासून तो तणावाखाली होता. ‘मी लांबच्या प्रवासाला निघालो आहे, उद्या माझे मोठे बॅनर लावा.’ असे त्याने रविवारी दुपारी गळफास घेण्यापूर्वी इतर मित्रांना सांगितले. घरी गेल्यानंतर जेवणासाठी आईला नकार देत तो माळ्यावर झोपायला गेला. काही मिनिटांतच गणेशने गळफास लावल्याचे दिसले.