Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘बापटसाहेब तुमचा स्वत:वर भरोसा नाय का?’

‘बापटसाहेब तुमचा स्वत:वर भरोसा नाय का?’

Published On: Jan 10 2018 10:37AM | Last Updated: Jan 10 2018 10:37AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

काय घ्यायचे ते अत्ताच घ्या वर्षभराने पुढे काय होईल हे सांगता येत नाही, असे वादग्रस्त विधान अन्‍न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले होते. बापट यांच्या या विधानाची मंत्र्यांमध्येही चर्चा होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, तर त्यांना काय बापटसाहेब तुमचा स्वत:वर भरोसा नाय का, असा सवालच केला.

पुण्यात डाळिंब परिषदेत बोलताना गिरीश बापट यांनी सरकारच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह लावणारे विधान केले होते. सत्तेत असलो तरी पुढे काय होईल, हे सांगता येत नसल्याचे सांगत लवकर कामे मार्गी लावून घेण्याचा सल्ला गिरीश बापट यांनी दिला होता. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकी वेळी सुधीर मुनगंटीवार व बापट यांची भेट झाली. या भेटीवेळी सुधीरभाऊंनी त्यांना कानपिचक्या देण्याची संधी साधली.

मात्र, गिरीश बापट यांनी या विधानाचा विपर्यास केल्याचे मुनगंटीवार यांना सांगितले. मी पुढे सरकार येणार नाही, असे म्हणालो नव्हतो. तर, या सरकारचा वेळ कमी राहिल्याने कामे लवकर होण्याच्या द‍ृष्टीने झटपट कामे करून घेण्याची सूचना केली होती, असे बापट म्हणाल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.