Sun, Jul 21, 2019 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन

बालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:47AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठी बालरंगभूमीच्या जन्मदात्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका सुधा करमरकर यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. मिलिंद करमरकर आहे. 

सोमवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला. यावेळी जयंत सावरकर, विजय केंकरे, लीला हडप, विलास गुर्जर, संजय क्षेमकल्याणी, प्रवीण कारळे, अरविंद पिळगावकर, अरुण काकडे, श्रीनिवास नार्वेकर, सुचित्रा बांदेकर, मधुरा वेलणकर, तुषार दळवी, विनय येडेकर, अशोक समेळ, रमेश भाटकर आदी उपस्थित होते.  

अखेरच्या श्‍वासापर्यंत सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीला वाहून घेतले होते. 2 ऑगस्ट 1969 रोजी केवळ बालनाट्याला वाहिलेली लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमीची स्थापना त्यांनी केली होती. या रंगभूमीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. नाट्यशिक्षणासाठी करमरकर परदेशी गेल्या. त्यांनी अमेरिकेत बालरंगभूमी अभ्यासली. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले.