Fri, Jul 19, 2019 22:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १०४ वर्षांच्या आजीवर यशस्वी शस्त्रक्रिया

१०४ वर्षांच्या आजीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:25AMमुंबई : प्रतिनिधी 

वय 80-85 घरात गेले की कोणताही डॉक्टर अशा व्यक्तींच्या फ्रॅक्‍चरसंबंधी शस्रक्रिया करायला तयार होत नाही. मात्र मुलुंड येथील उपासनी सुपर स्पेशिअ‍ॅलिटी रुग्णालयात डॉ. तेजस उपासनी यांच्या नेतृत्वाखालील ऑर्थोपेडिक शल्यविशारदांच्या पथकाने 104 वर्षांच्या आजीवर हिप फ्रॅक्चर सांधण्यासाठी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. 

मुलुंडच्या रहिवाशी असलेल्या 104 वर्षीय आजी श्रीमती गाला पलंगावरुन उठताना पडल्या. त्यांच्या उजव्या खुब्याला फ्रॅक्चर झाले. त्यांना कोणतीच हालचाल करणे शक्य नव्हतेच शिवाय त्यांना तीव्र वेदनाही होत होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना त्वरित उपासनी सुपर स्पेशिअ‍ॅलिटी रुग्णालयात नेले.  तपासणी केल्यानंतर डॉ. तेजस उपासनी यांनी त्यांना आशेचा किरण दाखवला. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा टेकू (सपोर्ट) आवश्यक होता. या वयाच्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी केली जाते. यामुळे त्यांना निदान बिछान्यात हालचाल करणे, कुशीवर वळणे एवढे करी करणे शक्य होते. भूलीचा (अनस्थेशिया) कमी डोस वापरून श्रीमती गाला यांचे फ्रॅक्चर सांधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

माझ्या आजीची ही रुग्णालयात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दुखण्यामुळे आजीने भितीने मला मी आता परत बसू शकणार वा उभीच राहू शकणार नाही का? असा प्रश्न विचारला होता. मी त्यावेळी तिला काहीच उत्तर दिले नाही. मग आम्ही तिला यूएसएसएचमध्ये घेऊन आलो. फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. योग्य ती शस्त्रक्रिया झाल्यावर आता आमची आजी बसू लागली आहे, असे रुग्णाचे नातू कीर्ती गाला यांनी सांगितले.