Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यशस्वी यादव विशेष पोलीस महानिरीक्षकपदी

यशस्वी यादव विशेष पोलीस महानिरीक्षकपदी

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बढत्या आणि बदल्यांचे आदेश अखेर गृहमंत्रालयाने बुधवारी काढले. यात आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच तपासासाठी नवे पद निर्माण केले असून या पदावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभातकुमार यांची नियुक्ती केली आहे. 

औरंगाबाद दंगलीनंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक यशस्वी यादव यांना पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेत विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बढती देऊन सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. 

यादव यांच्या नियुक्तीसाठी शासनाने अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे पद अवनत केले आहे. तर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नुकतीच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने रिक्त झालेल्या जागी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक डॉ. सुहास वारके यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देत नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बढती देत, त्यांची नागपूर परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. छेरींग दोर्जे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बढती देत नाशिक परीक्षेत्र येथे, तर नायगाव येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयातील अप्पर पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच संरक्षण व विशेष सुरक्षा विभाग मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त रावसाहेब शिंदे यांना बढती देत राज्य गुप्तवार्ता प्रबोधीनी पुणे येथे संचालक पदी बदली करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सह आयुक्त संजय सक्सेना यांना अप्पर पोलीस महासंचालक पदी बढती देत प्रशिक्षण व खास पथके मुंबई येथे बदली करण्यात आल्याने रिक्त झालेल्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त आशुतोष डुंबरे यांची बदली करण्यात आली आहे. तर डुंबरे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही. के. चौबे यांची वर्णी लागली आहे. प्रशासन विभागाच्या प्रमुख सह आयुक्त अर्चना त्यागी यांना अप्पर पोलीस महासंचालक पदी बढती देत राज्य राखीव पोलीस बल मुंबई येथे बदली करत रिक्त झालेल्या जागी राज्य गुप्तवार्ता विभागाचे सह आयुक्त संतोष रस्तोगी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलीस बल मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्‍नोई यांची अस्थापना विभागात, तर सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांची नियोजन व संनियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे पद अवनत करुन त्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांची गृहरक्षक दल व उपसंचालक नागरी संरक्षण मुंबई येथे पदोन्नतीने उपमहासमादेशक पदावर बदली केली आहे.