Wed, Feb 20, 2019 17:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...म्हणून राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस : अशोक चव्हाण

...म्हणून राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस : अशोक चव्हाण

Published On: Jun 20 2018 1:44PM | Last Updated: Jun 20 2018 1:44PMमुंबई : प्रतिनिधी

जळगावमधील त्या मुलांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता, माध्यमांनीही तो दाखवला होता. मात्र जळगाव घटनेतील मुळ विषयापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधींना राज्य बालहक्क आयोगाकडून नोटीस बजावण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीय, गरीबांवर अन्याय वाढले आहेत, त्याचे ताजे उदाहरण जळगावमधील मुलांवरील अत्याचाराचे आहे.मात्र असे प्रकार घडत असताना सरकारकडून कुठली कारवाई केली जात नाही. अशा गोष्टींविरोधात आवाज उठवायचा नाही का? आवाज उठवला, त्यात कारवाईची मागणी केली तर त्यात गैर काय? असा प्रश्न चव्हाण यांनी केला आहे. 

या प्रकरणात राहुल गांधी यांना बालहक्क आयोगाने जी नोटीस बजावली आहे.त्यातील कायदेशीर बाबी तपासून काँग्रेस पक्ष पुढील भूमिका स्पष्ट करेल असे, त्यांनी म्हटले आहे.