Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ खरेदीची सक्ती होणार बंद

चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ खरेदीची सक्ती होणार बंद

Published On: Jun 19 2018 1:44AM | Last Updated: Jun 19 2018 1:43AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थ खरेदीची असलेली सक्ती आता बंद होणार आहे. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहांमध्ये आणण्यास मुभा देणारे नवीन धोरण राज्य सरकार लवकच जाहीर करणार आहे.

राज्यातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ कित्येक पटींनी महाग विकले जातात. दहा रुपयांना मिळणारा समोसा मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये 70 ते 75 रुपयांना,  पाण्याची बाटली 50 रुपयांना तर 20 रुपयांचे पॉपकॉर्न 60 ते 90 रुपयांना विक्री केले जातात. त्यामुळे प्रेक्षकांच्या खिशाला कात्री लागत आहे. याविरोधात जितेंद्र बक्षी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्या. राजेश केतकर आणि आर. एम. बोर्डे यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. बाहेरील खाद्यपदार्थ प्रेक्षकांनी का नेऊ नयेत, सिनेमागृह म्हणजे विमानतळ नव्हे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच लोकांची तपासणी करण्याची गरज नाही. प्रेक्षकांनी केवळ तिथूनच का खाद्यपदार्थ खरेदी करायचे, त्यांच्यावर सक्ती कशासाठी, असे सवालही न्यायालयाने उपस्थित केले होते. याबाबत 27 जून रोजी राज्य सरकार उच्च न्यायालयात म्हणणे मांडणार आहे.