Tue, Sep 25, 2018 06:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने

राज्य सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची निदर्शने

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:42AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 19 लाख सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयासह राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत अधिकारी, कर्मचार्‍यांनी संतप्त निदर्शने केली. 

सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत त्वरित निर्णय घ्या. राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही, तर सरकारविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुंबईत मंत्रालयाबाहेर झालेल्या द्वारसभेत देण्यात आला.