Mon, Jul 22, 2019 01:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी संप Live : नांदेडमध्ये संपाला हिंसक वळण

एसटी संप Live : नांदेडमध्ये संपाला हिंसक वळण

Published On: Jun 08 2018 8:20AM | Last Updated: Jun 08 2018 4:37PMमुंबई : पुढारी ऑऩलाईन

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेतन वाढीच्या मुद्यावरुन गुरुवारी रात्रीपासून कोणतीही पूर्व सूचना न देता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. राज्यातील विविध भागातील कर्मचारी या संपात सहभागी आहेत. सांगली, कोल्हापूर, पुणे रायगड आणि परळ अशा विविध आगारात एसटी बसेसच्या कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. बस आगारात थांबून आहेत. परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवत आहेत, अशी भावना रायगड जिल्ह्यातील महाड आगारातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

 सरकारने संपाकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयात धाव घेऊ अशी भूमिकाही कर्मचारी मांडत आहेत.  

वाचा : ST Strike : काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या? 

Live Update

*राज्यात आज दि. ८ जुन रोजी सुरू झालेल्या एसटीच्या अघोषित संपामुळे एसटीचे सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला 

*पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

*नांदेडमधील भोकर तालुक्यात संपादरम्यान हिंसक वळण

*एसटी नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यांना प्रवासासाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे 

*मात्र बसच्या प्रतिक्षेत प्रवाशी बसस्थानक व रस्त्यावर अडकले  

*कुडाळ : एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाला कुडाळसह जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद  

*महाड : परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवत आहेत, कर्मचाऱ्यांची भावना

 

  * सांगली स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा

 

 * संप नक्की कोणत्या संघटनेने पुकारला आहे हे माहित नसल्याने कर्मचाऱ्यांत संभ्रम

* रायगड जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद

*परळमध्ये अनेक बसेस आगारामध्ये

* भंडारा जिल्ह्यातील एसटी सेवाही बंद

* सांगलीत शिवशाही वगळता सर्व बसेस बंद

* कोल्हापूरमध्ये सकाळी पाचपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला

गारगोटी आगारातील चालक - वाहकांनी मध्यरात्रीपासून पुकारलाय अघोषीत बंद 

* आगाराच्या १७५ फे-या रद्द झाल्यामुळे सुमारे साडेआठ लाख रूपये उत्पन्न बुडाले आहे.