Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयटीआयच्या प्रवेशाला प्रारंभ

आयटीआयच्या प्रवेशाला प्रारंभ

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी 

व्यवसाय शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशाला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सुरुवात केली आहे. 4 जूनपासून भरलेला अर्ज शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरुन निश्‍चित करता येणार आहे.  दहावीच्या निकालानंतर प्रवेश फेर्‍याचे नियोजन जाहीर केले जाणार आहे. असेही संचालयाने कळवले आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे असणारा कल गेल्या काही दिवसापासून वाढला आहे. यंदा 79 ट्रेड मध्ये उमेदवारांना प्रवेश घेता येणार आहे. काही ट्रेड अभियांत्रिकी प्रकारचे तर काही विगर अभियांत्रिकी स्वरुपाचे आहेत. प्रवेशाबाबत मर्गादर्शन करण्यासाठी 15 ते 30 जॅन दरम्यान प्रत्येक शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रथम विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर त्याला हवा त्या अभ्यासक्रम (ट्रेड)चे ऑप्शन (विकल्प) भरु कशणार आहे. प्रवेशाच्या एकूण 9 फेर्‍या होणार आहेत. शासकीय संस्थेतील 100 टक्के प्रवेश याच प्रक्रियेतून दिले जातील तर खाजगी आयटीआसाठीचे 80 टक्के प्रवेश यातून होणार आहेत.

माहिती पुस्तिका इथे मिळेल...

विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहितीपुस्तिका प्रशिक्षण संस्थामध्ये मिळणार असून सकाळी 10 ते 11 यावेळेत प्रवेशप्रक्रियेविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे. प्रवेशासंबंधी काही अडचणी असल्यास विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रावर उपलब्ध असणार्‍या कर्मचार्‍याला विचारु शकतात.असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. पुस्तकेची किंमत 60 रुपये असून याची ही पुस्तिका संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आली आहे.

इथून अर्ज करा...

http://admission.dvet.gov.in/  या वेबसाईटवर विद्यार्थी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

असे होतील प्रवेश

- अर्ज भरणे-सुरुवात झाली
- अर्ज निश्‍चिती-4 पासून
- पहिल्या फेरीसाठी अभ्यासक्रम पर्याय सादर करणे - 4 जूनपासूनयंदाच्या संभाव्य जागा
शासकीय आयटीआय : 93672
खाजगी आयटीआय : 42521
एकूण : 136193

मुंबई विभागीय जागा
शासकीय आयटीआय : 16367
खाजगी आयटीआय : 3214
शासकीय आयटीआय =491
खाजगी आयटीआय =908
आकडे सांगतात
जनरल आयटीआय : 307
अदिवासी आयटीआय 61
फक्‍त महिला आटीआय 15
आश्रमशाळा आयटीआय 28
अनुसूचित जाती आयटीआय 04
अल्पसंख्याक आयटीआय : 02

महत्वाचे अभ्यासक्रम 

एक वर्ष मुदतीचे यांत्रिकी, नळ कारागीर, गवंडी, सुतारकाम, संधाता, पत्रेकारागीर, यांत्रिक डिझेल, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, कर्तन, शिवणशास्त्र, भरतकाम, विणकाम, हेअर अँड स्कीन केअर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, लघुलेखन इंग्रजी, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोसेसिंग  दोन वर्षे मुदतीचे यांत्रिक कृषी, रंगारी, तारतंत्री, यांत्रिक मोटारगाडी आरेखक, यांत्रिकी आरेखक, स्थापत्य, वीजतंत्री, य्टी.व्ही. दुरुस्ती, यंत्रकारागीर घर्षक, , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स, वीज विलेपक, मेकॅनिकल, मशीन टूल्स मेटेंनन्स, टूल अँड डायमेकर अभ्यासक्रम आहेत.