Thu, Apr 25, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण

भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Jan 02 2018 7:07PM | Last Updated: Jan 02 2018 7:07PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भीम-कोरेगावमधील हिंसाचारानंतर राज्यात पसरलेले हिंसाचाराचे लोण हे राज्य सरकारचे सर्वांत मोठे अपयश आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर जनतेला शांतता राखण्याचे आवाहनही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले. 

चव्हाण म्हणाले, 'भीमा-कोरेगावनंतर राज्यात उद् भवलेली परिस्थिती हे राज्य सरकारचे अपयश आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. पण, गेल्या दोन दिवसांतील परिस्थिती पाहता. राज्य सरकारला त्यात अपयश आले आहे.' उद्या दलित संघटनांकडून राज्यात बंदची हाक देण्यात आली असली, तरी कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी संघटनांनी घ्यावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. जातीय दंगल पसरविण्यासाठी कोणी परिस्थितीचा गैरफायदा घेतला?, त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित केला. 

संबंधित बातम्या 

भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले?

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

भीमा कोरेगाव प्रकरण:अफवांवर विश्वास न ठेवण्‍याचे आवाहन

फूट पाडणाऱ्यांचा डाव हाणून पाडा : अशोक चव्हाण