Thu, Jun 27, 2019 13:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेंट झेवियर्सला मिळाले पहिले मराठमोळे प्राचार्य

सेंट झेवियर्सला मिळाले पहिले मराठमोळे प्राचार्य

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 12:44AMमुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मुंबईत नावाजलेल्या नामाकिंत सेंट झेवियर्स महाविद्यालयास पहिले मराठमोळे प्राचार्य लाभले आहेत. 150 वर्षाच्या इतिहासमध्ये राजेंद्र शिंदे हे पहिले मराठी प्राचार्य म्हणून नियुक्‍ती झाली आहे. प्राचार्य पदाचा पदभार ते येत्या 1 सप्टेबर पासून स्वीकारणार आहेत. 

गुणवंत विद्यार्थ्यांचे आकषर्र्ण असलेल्या आणि दक्षिण मुंबईत नामांकित म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महाविद्यालयास आतापर्यंत ख्रिश्चन समाजातील प्राचार्यांनी पद भूषविले आहेत. सद्यस्थितीत याच महाविद्यालयात शिकवत असलेल्या प्राध्यापकमध्ये सर्वात अनुभवी म्हणून असलेल्या राजेंद्र शिंंदे यांचे नाव प्राचार्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 

प्रा. शिंदे यांनी वनस्पतीशास्त्र विषयात पीचडी केली असून ते झेवियर्स महविद्यालयात या विषयाचे विभागप्रमुख म्हणून काम पहात आहेत. महाविद्यालयाचे ते 24 वे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. प्रा.शिंदे यांचे श्रीरामपूर येथील पुणतांबा या गावात सरकारी शाळेत त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंर त्यांनी झेविअर्स कॉलेजशी संलग्न असलेल्या वांद्रे येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत प्रवेश घेतला. 1980मध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र हे तीन विषय घेऊन मी प्रथमवर्ष पदवी झेवियर्स मध्ये पूर्ण केली. तेव्हापासून या महाविद्यालयांशी त्यांची नाळ जोडली आहे. प्राध्यापक, व्याख्याता त्यानंतर परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समन्वय विभाग, उप-प्राचार्य या पदांवर त्यांनी सेंट झेवियर्स मध्ये काम केले आहे. 

यावेळी प्राचार्यपदाची जाहिरात आल्यानंतर रितसर अर्ज करून मुलाखत देऊन त्यांची या पदावर निवड झाली आहे. त्यांना प्राध्यापक म्हणून तर प्रशासनात काही काळ काम करण्यांची संधी मिळाली आहे. 38 वर्षे सेंट झेवियर्सची त्यांचा घनिष्ठ संबंध राहिल्याने अनुभवी प्राचार्य झेवियर्स महाविद्यालयास मिळाला आहे.