Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवींचे पार्थिव आज मुंबईत येणार

श्रीदेवींचे पार्थिव आज मुंबईत

Published On: Feb 27 2018 2:17AM | Last Updated: Feb 27 2018 7:22AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

हवाहवाई श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारनंतर  मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. दुबईतील कायदेशीर प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे सोमवारी मृतदेह आणता आला नव्‍हता. दरम्यान, मुंबईत अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली असून आज अंत्यविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीनंतर रविवारपासूनच त्यांच्या मुंबईतील निवासस्‍थानाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे. सोमवारीही मृतदेह आणला जाण्याची शक्यता असल्याने चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र, दुबईतील कायदेशीर प्रक्रियेला विलंब झाला. 

दरम्यान, श्रीदेवीचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून झाल्याचे एका अहवालानुसार पुढे आले असून त्यांचा मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात असल्याचे बोलले जात आहे. तसेच श्रीदेवीच्या शवविच्‍छेदन अहवालात अल्‍कोहोलचे अंश आढळले आहेत. दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर व बहिण श्रीमाला यांची चौकशी केली आहे. 

मुंबईत अनिल कपूर यांच्या निवासस्‍थानी बॉलिवूडमधील दिग्‍गजांनी हजेरी लावली. रजनीकांत, कमल हासन, अनुपम खेर, शाहरुख खान आदी कलाकारांनी कपूर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्‍वन केले.