Wed, Jan 23, 2019 06:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

Published On: Feb 25 2018 8:19AM | Last Updated: Feb 25 2018 8:30AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

हिंदी चित्रपटांवर आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी दुबईत निधन झाले. पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह त्‍या दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्‍यातच त्‍यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी ज्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या त्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ श्रीदेवीचा अखेरचा ठरला.